रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (08:55 IST)

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ नाही

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणार नाही. याआधी विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून देखील ही मागणी होत आहे. पण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने मुदतवाढीला स्पष्ट नकार दिला आहे.

सीबीडीटीने  आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात स्पष्ट नकार देताना, आयकर रिटर्न 31 जुलैपर्यंतच भरावे लागतील, असं स्पष्ट म्हणलं आहे. याच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही सीबीडीटीनं यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत 2 कोटी करदात्यांनी ऑनलाई पद्धतीनं रिटर्न फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केलीय. यावेळी रिटर्न फाईल करताना 9 नोव्हेंबर 2016  ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरली असल्यास, त्याची माहिती द्यावी लागणार आहे.