मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

तिमाहीतील जीडीपी घसरुन 5 टक्क्यांवर

केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून या तिमाहीतील जीडीपी  घसरुन 5 टक्क्यांवर आलाय. गेल्या साडे सहा वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी  आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारचा भांडवली खर्च कमी होणे, विविध क्षेत्रातील घट, विक्री कमी होणे यासह विविध कारणांमुळे जीडीपीत  घसरण झाली आहे. गेल्या वर्षातील अखेरच्या तिमाहीत 5.8 टक्के जीडीपीची नोंद करण्यात आली होती.
 
क्षेत्रनिहाय जीडीपी
 
    2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (12.01 टक्के) निर्मिती क्षेत्रात 0.6 टक्क्यांची वाढ झाली.
    2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (5.01 टक्के) जीव्हीए (कृषी, वनीकरण आणि मत्स्य क्षेत्र) यामध्ये 02 टक्क्यांची वाढ झाली.
    2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (0.4 टक्के) खाण आणि उत्खनन क्षेत्रात 2.7 टक्क्यांची वाढ झाली.
    वीज, गॅस, पाणी पुरवठा आणि इतर सेवा क्षेत्रात 2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (6.7 टक्के) यावेळी 8.6 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
    बांधकाम क्षेत्रात 2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (9.6 टक्के) यावेळी 5.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
    2018-19 च्यपहिल्या तिमाहीच्या तुलनेत (7.08 टक्के) व्यापार, हॉटेल, वाहतूक, संवाद आणि सेवा क्षेत्रात या तिमाहीत 7.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
    2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (6.5 टक्के) वित्त, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात यावेळी 5.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
    2018-19 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत (7.5 टक्के) लोक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्रात 8.5 टक्के वाढ झाली.