1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

खास कॅनरा बॅंकेच्या ग्राहकांसाठी, ओटीपी झाला अनिवार्य

For exclusive Canara Bank customers
कॅनरा बॅंकेने ग्राहकांना सुविधा देण्यासाठी दहा हजारपेक्षा जास्त रकमेवरील व्यवहारावर ओटीपी अनिवार्य केला आहे. त्यामुळे एटीएम व्यवहार करताना मोबाईल बाळगणे गरजेचे असणार आहे.
 
देशातील कोणत्याही ठिकाणाहून झालेल्या एटीएम व्यवहारादरम्यान फोन नंबरवरील ओटीपी अनिवार्य असेल. स्टेट बॅंक देखील एटीएम व्यवहारावर OTP अनिवार्य करणार आहे. यामुळे संभावित धोके टळू शकतील असे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे उप महाव्यवस्थापक सुरेश नायर यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त अन्य बॅंकाही या प्रक्रियेवर काम करत आहेत.
 
बॅंकेतील आर्थिक व्यवहारात फसवणुकीच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येत असतात. पण आता कॅश काढताना ओटीपी मागितला गेल्यास असे प्रकार टाळता येणार आहेत. मोबाईलमध्ये आलेला ओटीपी तुम्हाला एटीएममध्ये रजिस्टर करावा लागणार आहे. त्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे.