शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (17:14 IST)

Indian Railwaysचा मोठा निर्णय! आता कोणीही ट्रेन भाड्याने घेऊ शकतो, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची योजना

भारतीय रेल्वेने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत कोणतीही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने घेऊ शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली आहे. या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे. या योजनेंतर्गत, 3333 कोच म्हणजेच 190 गाड्या रेल्वेने चिन्हित केल्या आहेत.
 
भारत गौरव ट्रेन धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सुमारे 190 गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी या गाड्यांची संख्या वाढवता येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
 
पर्यटन स्थळांसाठी चालतील गाड्या 
या गाड्या पर्यटन स्थळांसाठी चालवण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालवणार आहे.
 
आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून या गाड्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय मार्ग ठरवण्याचे अधिकार कंपनीला असतील.
भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC या दोघांद्वारे चालवली जाऊ शकते आणि या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल.