सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (13:19 IST)

महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ

देशातील महागाईने हैराण झालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. वास्तविक, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती आज 1 मे पासून 100 रुपयांनी वाढल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  गेल्या महिन्यात म्हणजेच1 एप्रिल रोजी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किमती 250 रुपयांनी वाढल्या होत्या. 
 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील लोकांना आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील. पूर्वी याची किंमत फक्त 2253 रुपये होती. त्याच वेळी, कोलकातामध्ये त्याची किंमत 2351 रुपयांवरून 2455 रुपयांपर्यंत वाढली आहे. मुंबईत आता 2205 रुपयांऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. 
 
14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत,  
तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 949.5 रुपये आहे. याशिवाय, कोलकातामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता 965.50 रुपये आहे. त्याच वेळी, लखनऊमध्ये घरगुती एलपीजीची किंमत 987.50 रुपये आहे, तर पाटणामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1039.5 रुपये आहे. काय आहे कमर्शिअल गॅस सिलिंडरची नवी किंमत - आजपासून म्हणजेच 1 मेपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाला आहे.