सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (17:17 IST)

महागाई दर 5 महिन्यांच्या नीचांकावर

किरकोळ बाजारातील महागाई दर 5 महिन्यांच्या नीचांकी स्थरावर आला आहे. सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या-अन्नधान्याचे दर कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली आहे. याआधी एप्रिल महिन्यात हा दर 2.99 टक्के होता. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील 2.99 टक्क्यांवरून कमी होऊन 2.17 टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात महागाई दर 5.76 टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याचा किरकोळ दर उणे 1.05 टक्क्यांवर आला. याशिवाय, फळे, कपडे, इंधन आणि घरांच्या किंमतीदेखील कमी झाल्या.