सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (19:57 IST)

महागाई : भाजीपाल्यासह अन्नधान्याच्या किंमतीत वाढ, सामान्य वर्गाचे बजेट कोलमडले

Small grains
Inflation:सध्या वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सध्या टोमॅटोचे दर गगनाला भेडले आहे. टोमॅटोच्या दराची सर्वत्र चर्चा होत आहे. भाज्यांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या टोमॅटोने किलोमागे 250 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांत टोमॅटोचा भाव 15 रुपयांवरून 250 रुपयांच्या वर गेला आहे. केवळ टोमॅटोच नाही तर हिरव्या भाज्यांची अवस्था दयनीय आहे. पुरवठा खंडित झाल्यामुळे टोमॅटो आणि भाज्यांचे भाव वाढत असतानाच, सामान्य गृहिणीच्या  स्वयंपाकघरातील मुख्यवस्तू ही बजेटच्या बाहेर जात आहे. तूरडाळ , तांदूळ, मैदा सर्वच महाग झाले आहेत.

टोमॅटोच्या किमतीवरून गदारोळ सुरू आहे, त्यामुळेच याची माहिती सर्वांनाच आहे, मात्र इतर खाद्यपदार्थांच्या किमती अशा प्रकारे छुप्या पद्धतीने वाढत आहेत की, कोणताही गदारोळ न होता त्याचा थेट परिणाम सामान्य माणसांचा खिशावर होत आहे.
 
सरकारी आकडेवारीत ही गोष्ट नमूद करण्यात आली असून, त्यानुसार केवळ भाज्याच नाही तर तांदूळ आणि डाळींचेही भाव वाढले आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून संसदेत माहिती देण्यात आली होती, त्यानुसार डाळींच्या किमतीत 28 टक्के वाढ झाली असून तांदळाची किंमतीत देखील  10.5 टक्क्यांनी वाढली आहे.
 
उडीद डाळ,तूरडाळ आणि मैद्याच्या किमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तांदळाची सरासरी किरकोळ किंमत एका वर्षापूर्वी 37 रुपयांच्या तुलनेत 41 रुपये आहे.
 
देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याचा परिणाम अन्नपदार्थांवर होत आहे. 2022-23 मध्ये पिकांचे उत्पादन 34.3 लाख टन होते, जे गेल्या वर्षी 42.2 लाख टन होते. अवकाळी पाऊस, पुरामुळे पिकांची नासाडी झाली असून, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी उत्पादन दर हे वाढीचे प्रमुख कारण आहे.
 
Edited by - Priya Dixit