गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (14:43 IST)

लाँचिंग आधीच झाली सर्व स्कूटरची विक्री

Italjet Dragster Limited Edition नावाने येणार्यान इटलीच्य स्कूटरने कमाल केली. लाँचिंग आधीच या स्कूटरची सर्वच्या सर्व स्कूटरची विक्री झाली आहे. कंपनीचे नवीन स्कूटर Italjet Dragster चे स्पेशल एडिशन व्हर्जन आहे.

इटलीची स्कूटर मॅन्यूफॅक्चरर  Italjet एक असे स्कूटर घेऊन आली आहे. लाँचिंग आधीच या स्कूटरची संपूर्ण विक्री झाली आहे. हे कंपनीचे येणार्याआ नवीन स्कूटर Italjet Dragster चे स्पेशल एडिशन व्हर्जन आहे. य याला Dragster च्या लाँचिंगला सेलिब्रेट करण्यासाठी आणले आहे. Italjet Dragster Limited Edition नावाने आलेल्या स्पेशल व्हर्जनला खास कलर आणि ग्राफिक्स स्कीम सोबत आणले आहे.
 
499 युनिटची विक्री
Italjet Dragster स्कूटर ला सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. यासोबतच हे स्पेशल एडिशन मॉडल येणार आहे. कंपनी ड्रॅगस्टर स्पेशल एडिशन स्कूटरचे केवळ 499 युनिट बनवणार आहे. या स्कूटरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे लाँचिंग आधीच सर्वच सर्व 499 स्कूटरची विक्री झाली आहे. कंपनीने सांगितले की, यातील सर्वात जास्त बुकिंग जपानधून झाले आहे.
 
कसा आहे लूक
Italjet Dragster लिमिटेड एडिशन मॉडेलची डिझाईन स्टँडर्ड ड्रॅगस्टर स्कूटर प्रमाणे आहे. या स्कूटरला फ्रंट अॅप्रेन, ट्रेलिस फ्रेम आणि हॉरिजॉन्टल फोर्क्स  लेस सस्पेन्शन सिस्टमवर गोल्डन ब्राँज अॅ क्सेंट्‌स सोबत ब्लॅक बेस कलरमध्ये आणले आहे. यावर अॅप्रेन टेलवर ‘लिमिटेड एडिशन'ची ब्रँडिंग पण आहे. तसेच टि्वन एलईडी हेडलँम्प, फ्रंट अॅप्रेनवर एअर वेंट पॅनेल, अप राईट हँडलबार, स्लिप्ट स्टेप अप सीट आणि एक्सपोस्ड ट्रेलिस फ्रेम यासारखे अन्य डिझाईन एलिमेंट्स स्टँडर्ड स्कूटर प्रमाणे आहेत.
 
दोन इंजिन व्हेरियंट
ड्रॅगस्टर स्कूटर दोन इंजिनच्या पर्यायात येणार आहे. ज्यात 125 सीसी आणि 200 सीसीच्या इंजिनाचा समावेश आहे. 125 सीसीच्या इंजिनमध्ये 15 बीएचपीचे पॉवर आणि 12.5 एनएम पीक टॉर्क, 200 सीसीच्या इंजिनसोबत 20 बीएचपीचे पॉवर आणि 17 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.
 
उपलब्धता
Italjet Dragster स्कूटर ला 20 हून जास्त देशात विकले जाणार आहे. परंतु, या देशात भारताचा समावेश नाही. Italje कंपनी कधी काळी भारतीय बाजारात होती. या ठिकाणी कायनेटिक सोबत ब्लेज स्कूटरची विक्री करीत होती.