बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (12:30 IST)

मारुती सुझुकीचा नफा वाढला

आर्थिक वर्ष 2017-18 च्या दुसऱ्या तिमाहीत मारुती सुझुकीचा नफा 3.41 टक्‍क्‍यांनी वाढत 2,484 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीत कंपनीचा नफा 2,402 कोटी रुपये होता. गेल्या तिमाहीच्या दरम्यान वस्तूंच्या किमतीत वाढ आणि जाहिरातींसाठी अधिक खर्च करण्यात आल्याने मार्जिन घटला आहे.
 
दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा मार्जिन घटत 16.9 टक्‍क्‍यांवर पोहोचला. दुसऱ्या तिमाहीत मारुती सुझुकीचे उत्पन्न 7 टक्‍क्‍यांनी वाढत 2,17,682 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत ते 2,03,227 कोटी रुपये होते.