मेगा ऑफर :नवीन मारुती अर्टिगा; दररोज फक्त 477 रुपये दराने घरी आणा
भारतीय ग्राहकांचा कारकडे पाहण्याचा दृष्टीकोण गेल्या काही वर्षांत खूप बदलला आहे आणि आता लोक मोठ्या आकाराच्या परवडणाऱ्या वाहनांना प्राधान्य देऊ लागले आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या अर्टिगा या गाड्यांना सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त लोकांची आसन क्षमता आणि केबिनमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. भारतीय कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, या गाड्यांमध्ये बरीच वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत, जी प्रवाशांच्या सर्व गरजा पूर्ण करतात. त्यामुळे जर आपण देखील मारुती अर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीने अशी स्कीम आणली आहे, जी आपण नाकारू शकणार नाही.
मारुती सुझुकी अर्टिगा ही 7-सीटर सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंती आहे आणि कंपनी लवकरच MPV चे नवीन मॉडेल बाजारात आणणार आहे. दिल्लीमध्ये अर्टिगा ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 8.12 लाख रुपयांपासून सुरू होते जी 10.85 लाख रुपयांपर्यंत जाते. हे MPV 4 ट्रिम LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus मध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 105PS पॉवर आणि 138Nm पीक टॉर्क बनवते. ही कार CNG व्हेरियंट मध्ये देखील विकली जात आहे जी 26.08 km/kg मायलेज देते, तर CNG मॉडेलमधील इंजिन 92PS पॉवर आणि 122Nm पीक टॉर्क बनवते.
जर ग्राहकांनी मारुती सुझुकी एर्टिगाला फायनान्स केले, तर त्याची 14,302 रुपयांची EMI दरमहा भरावी लागेल. या MPV ला फायनन्स करताना, सुमारे 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. या कर्जाच्या रकमेवर 5 वर्षांसाठी वार्षिक 8 टक्के व्याज द्यावे लागेल. अशा परिस्थितीत जर आपण 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर दररोज आपल्याला फक्त 477 रुपये द्यावे लागतील. मारुती सुझुकी अर्टिगा वर उपलब्ध असलेले हे कर्ज 8 टक्के व्याजदराने दिले जात आहे, जे या क्षेत्रातील सर्वात कमी व्याजदर आहे.