1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 मार्च 2025 (14:57 IST)

महागाईचा फटका, आजपासून दूध 2 रुपयांनी महागले

milk
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. महागाईने सर्वसामन्याचे हाल होत आहे. आता पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. आता सर्वसामान्य माणसाला दुधासाठी 2 रुपये वाढवून द्यावे लागणार आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली असून सध्या उन्हाळ्यात दुधजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढल्यामुळे आता गायीच्या आणि म्हशीच्या दुधात दोन रुपये वाढवण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. आज शनिवार पासून दुधाचे नवीन वाढलेले दर लागू होणार आहे. 
बुधवारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुधात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे,त्यामुळे सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता गायीच्या दुधासाठी ग्राहकांना 56 रुपयांवरून वाढून 58 रुपये मोजावे लागणार आहे. तर म्हशीच्या दुधासाठी ग्राहकांना 72 रुपयांवरून 74 रुपये मोजावे लागणार आहे. दुधाचे हे नवीन दर आज 15 मार्च पासून लागू झाले आहे. 
Edited By - Priya Dixit