बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (09:12 IST)

इंधन दरवाढीचा बारावा दिवस, पुन्हा एकदा किंमती वाढल्या

पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या बहुतांश शहरात पेट्रोलच्या एका लीटरसाठी ८५ हून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. दरवाढीचा शुक्रवार अर्थात आज सलग बारावा दिवस आहे. मुंबईत आजच पेट्रोल ८५ रुपये ६५ पैसे  आणि डिझेल ७३ रुपये २० पैशाला मिळंतय. गुरुवारच्या तुलनेत पेट्रोल ३६ पैसे तर डिझेल २५ पैसे महाग झालंय.

 

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसतोय तसा तो राज्याच्या सीमाभागातील पेट्रोलपंप मालकांनाही बसतोय. याचा परिणाम प्रामुख्यानं गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर दिसून येतोय. महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्ये असूनही दोन्ही राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी  तफावत आहे. गुजरात राज्यात पेट्रोल ७७.१३ रूपये लीटर आहे तर महाराष्ट्रात ८५.६० रूपये लीटर.. गुजरात राज्याने पेट्रोलवरील कर कमी केल्याने येथील पेट्रोलच्या किंमती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमे शेजारील गुजरातमधल्या पेट्रोलपंपांची चलती सुरू आहे.