रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2017 (10:55 IST)

ओएनजीसीमध्ये एचपीसीएलचे विलीनीकरण

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनी देशातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) तब्बल ४४ हजार कोटी रुपये मोजून ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे. देशातील तेल कंपन्या एकत्र करून जगातील एक विशाल तेल कंपनी निर्माण करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार या दोन कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील सरकारी तेल कंपन्यांचे विलीनीकरण करून जगातील मोठय़ा समकक्ष तेल कंपन्यांसारखी विशाल तेल कंपनी स्थापन करण्याचा सूतोवाच अर्थसंकल्पात केला होता. ओएनजीसी ही भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आहे. ती कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील सरकारचे ५१.११ टक्के भांडवल सुमारे ४४ हजार कोटी रुपये मोजून खरेदी करणार आहे. तसेच एचपीसीएल कंपनीतील इतर गुंतवणूकदारांकडील २६ टक्के भांडवल देखील खरेदी करण्याचा प्रस्ताव यानंतर मांडण्यात येणार आहे. एचपीसीएल कंपनीची वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता २३.८ दशलक्ष टन आहे. ही क्षमता ओएनजीसीकडे आल्यामुळे ती कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी तेलशुद्धीकरण कंपनी होणार आहे.