शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2016 (14:42 IST)

नोटाबंदीमुळे जीडीपी घसरणार - पी. चिंदमबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री

केंद्र सरकारने यशवंत सिंह, मनमोहन सिंह यांचा सल्ला घ्यायला हवा होता. राज्यसभेत पंतप्रधान उपस्थित राहत नाही. नोटाबंदीवर चर्चा कशी करणार? तर हा निर्णय सरकारच्या अंगाशी येंणार असून देशाचा जी डी पी घसरणार आहे असे मत -पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नोटाबंदीमुळे धनाढ्यांचे काहीही नुकसान झाले नाही, यामुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे - नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार,काळा पैसा थांबला? यामुळे केवळ गरिबांना त्रास होत आहे. 45 कोटी लोकं नोटाबंदी निर्णयामुळे प्रभावित झालेत, त्यांची भरपाई कोण करणार ? बँकांमध्ये नोटा नाहीत, सरकार म्हणते नोटा आहेत, जिल्हा सहकारी बँकांमध्ये कॅश नसल्याने शेतक-यांना याचा फटका बसत आहे. मग सरकार डावे का करत आहेत असे हि चिदंबरम यांनी मत व्यक्त केले आहे.
 
नोटाबंदी देशातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, याची चौकशी झाली पाहिजे. देशातील स्थिती पूर्ववत होण्यास जवळपास ७ महिने तो पर्यंत सामान्य माणसाला शिक्षा होणार हे आमत्र नक्की असे ही ते चिदंबरम बोलले आहेत.