कर्मचारी पेन्शन योजना ९५च्या अंतर्गत निवृत्तीधारकांची पेंशन वाढणार
कर्मचारी पेन्शन योजना ९५च्या अंतर्गत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना अंतरिम दिलासाच्या अंतर्गत किमान पेन्शन ५००० रुपये व अखेरीस ७५०० रुपये मिळू शकतात. या संबंधात काम करणाऱ्या संघटनेने कामगार मंत्रालयातून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारे ही माहिती दिली आहे. ऑल इंडिया ईपीएस-९५ पेन्शनर्स संघर्ष समितीने ही माहिती दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारा (ईपीएफओ) असलेल्या कर्मचारी पेन्शन योजना १९९५ (ईपीएस-९५) सध्या १००० रुपये मासिक पेन्शन आहे. संघर्ष समितीने एका निवेदनात सांगितले की, कामगार मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये समितीच्या शिष्टमंडळाला ईपीएस-९५ अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना ७५०० रुपये मासिक निवृत्तीवेतन मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.