मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 15 जून 2021 (09:05 IST)

Petrol and diesel price: मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने केव्हाच शंभरी गाठली आहे. मात्र, आता हैदराबाद या मेट्रो सिटीतही पेट्रोल (Petrol Price) शंभरीपार जाऊन पोहोचले आहे. सोमवारी तेल कंपन्यांकडून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे, पेट्रोलने शंभरी गाठलेले हैदराबाद हे मुंबईनंतर देशातील दुसरे महानगर ठरले.
 
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर भरभर वाढायला सुरुवात झाली होती. सोमवारी झालेली दरवाढ ही गेल्या सहा आठवडय़ांतील 24 वी दरवाढ असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 
 
मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 102.58 रुपये, तर डिझेलचा दर 94.70 रुपये इतका आहे. 
पुण्यातही पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.18 आणि 92.86 इतका आहे. 
नाशिकमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 102.94 आणि 93.59 इतका आहे. ही परिस्थिती बघता लवकरच डिझेलही शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.
 
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.