सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 17 जून 2021 (11:20 IST)

मुंबईत पेट्रोलची किंमत 102.82, आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. काल डिझेलच्या दरात जास्तीत जास्त 14 पैशांची वाढ झाली होती, तर पेट्रोलच्या दरातही 25 पैशांची वाढ झाली होती. 4 मेपासून पेट्रोल 6.26 रुपयांनी तर डिझेल 6.68 रुपयांनी महाग झाले आहे.
 
आजही दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.66 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.41 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 102.82 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 94.84 रुपये आहे. एका महिन्यात वाहनाच्या इंधनाच्या दरात 26 व्या वाढीनंतर देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर बुधवारी नवीन उच्चांकीवर पोहोचले.
 
राजस्थानमध्ये डिझेलचे दर प्रति लिटर 100 रुपयांवर पोचले, तर कर्नाटकही पेट्रोलच्या किंमतींचे शतक ठोकणार्‍या राज्यात सामील झाले. कर्नाटक हे देशातील सातवे राज्य आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर आहे.
 
मोठ्या महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या
दिल्ली: डीजल-87.41, पेट्रोल-96.66
मुंबई: डीजल-94.84, पेट्रोल-102.82
कोलता: डीजल-90.25, पेट्रोल-96.58
चैन्नई: डीजल-92.04, पेट्रोल-97.91
 
आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील समजू शकते. इंडियन ऑयल वेबसाइटनुसार, आपल्याला RSP आणि आपला शहर कोड लिहावा लागेल आणि 9224992249 क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.
 
येथे चेक करा: https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx