बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (17:18 IST)

Petrol Diesel Price : चार महिन्यांनंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Petrol Diesel Price: Petrol-diesel price hike today after four months Petrol Diesel Price : चार महिन्यांनंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढMarathi Business News Business Marathi In Webdunia Marathi
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना इंधनाच्या दरात वाढ करणे आवश्यक झाले असून त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ झाली.
 
देशात चार महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपासून डिझेलच्या दरात 76 ते 86 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 76 ते 84 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.21 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 87.47 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.21 रुपये तर डिझेलची किंमत 87.47 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 110.82 रुपये आणि डिझेलचा दर 95.00 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 105.51 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 90.62 रुपये प्रति लीटर आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.16 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.19 रुपये प्रति लिटर आहे.