शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोल, डिझेलच्या दराचा भडका

पेट्रोल आणि डिझेलच्या दराने देशभरात उच्चांक गाठला. केंद्र सरकाने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोल व डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ करण्यात आली.
 
दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 73 रुपये 73 पैशांवर पोहचले तर डिझेलचे दर 64 रुपये 58 पैशांवर पोहोचले. मुंबईतही पेट्रोलच्या दराने 81 रुपयांचा तर डिझेलच्या दराने 68 रुपयांचा पल्ला ओलांडला आहे.
 
मुंबईत या वर्षभरात पेट्रोल तब्बल 9 रुपयांनी महागले आहे. 1 एप्रिल 2017 रोजी मुंबईत पेट्रोल 72.66 रुपये दराने मिळत होते. त्यात तब्बल 9 रुपयांची वाढ झाली असून आता ते 81.58 रुपयांवर पोहोचले आह. डिझेलच्या दरातही वर्षभरात 7 रुपयांहून अधिक वाढ झाली असून ते 61.27 रुपयांवरुन 68.77 रुपयांवर पोहोचले आहे.