1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2016 (10:13 IST)

पेट्रोल पंप संप मागे कमिशन मध्ये वाढ

पेट्रोलपंप चालकांनी दोन दिवस पुकारलेलं ‘इंधन खरेदी बंद’ आंदोलन मागे घेतला आहे. तेल वितरक आणि पेट्रोलपंप चालकांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
डिझेलमध्ये १० पैसे आणि पेट्रोलमध्ये १३.८ पैसे कमिशनची वाढ देण्याचं तेल कंपन्यांनी मान्य केलं आहे. आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. याबाबत तसा लेखी करारही करण्यात आला आहे. अन्य मागण्यांबाबतही निर्णय घेण्यासाठी एक समिति नियुक्त करण्यात आली आहे.