गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (09:51 IST)

प्लॅटफॉर्म तिकीटाबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Platform tickets at 124 railway stations in Bhusawal division from Friday at Rs 10
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आता १२४ रेल्वे स्थानकावर शुक्रवार पासून प्लॅटफॅार्म टिकीट १० रुपयाला मिळणार आहे. कोरोनामुळे अगोदर रेल्वे प्लॅटफॅार्म टिकीट बंद केले होते. त्यानंतर ११ मार्च पासून ते भुसावळ विभागातील ९ स्थानकावर ५० रुपये दर ठेऊन देण्यात येत होते. पण, आता सर्वच स्थानकावर हे टिकीट मिळणार असून त्याचे दर हे पूर्वीसारखेच १० रुपये असणार आहे.
 
भुसावळ विभागातील नाशिकसह मनमाड, भुसावळ, जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती, बडनेरा, शेगांव, या नऊ स्थानकावर हे तिकीट मिळत असले तरी त्याचे दर ५० रुपये होते. पण, आता हे दर १० रुपयेच असणार आहे.
याबाबत भुसावळ रेल्वे विभागाने माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, कोविड १९  च्या महामारीमुळे  भुसावळ विभागातील ९ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु केले होते.आता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन द्वारा  भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटची सुविधा दिनांक ११ जून २०२१ पासून सुरू होणार आहे. सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असणार आहे.