शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींना पोलीस कोठडी

Police custody for accused in PMC Bank scam
पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी बँकेचे व्यवस्थापक जॉय थॉमसला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर सुरजितसिंगला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क ची याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली असून याबाबत २२ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सुरजितसिंग आरोरा आणि जॉय थॉमसला आज गुरूवारी कोर्टात हजर करण्यात आले.
 
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) सध्या टाळे ठोकण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला. दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या बँकेत ठेवी ठेवणारे ५९ वषीय फत्तोमल पंजाबी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या २४ तासात घडलेली ही दुसरी घटना आहे. सोमावारी ५१  वषीय संजय गुलाटी यांचाही मृत्यू झाला.