रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

डेबिट कार्ड वापरावरील दराचा नवा मसुदा तयार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डेबिट कार्डच्या वापरावरील दराचा नवा मसुदा जारी करण्यात आला आहे. यावर पूर्णपणे विचार झाल्यानंतर 1 एप्रिलपासून नवे दर लागू होतील. 31 मार्चपर्यंत सध्याच्या दरानुसार एक हजार रुपयाच्या व्यवहारावर जास्तीत जास्त अडीच रुपये सर्व्हिस चार्ज लागेल, तर एक ते दोन हजार रुपयांदरम्यानच्या व्यवहारासाठी जास्तीत जास्त 10 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणजेच मर्चंट डिस्काऊंट रेट लागेल. दोन हजार रुपयांवरील व्यवहारासाठी एक टक्का दराने चार्ज लागेल.
 
तर  20 लाख रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्वाईप मशिनच्या व्यवहारावर जास्तीत जास्त 0.4 टक्के सर्व्हिस चार्ज आकारता येईल. सोबतच दुकानावर जर स्वाईप मशिनऐवजी क्यूआर कोड स्कॅन करुन व्यवहार केला तर 0.3 टक्के चार्ज लागेल. म्हणजेच एक हजार रुपयांवर 3 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल. 20 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्याकडे खरेदी केल्यास 0.95 टक्के या दराने सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. म्हणजे एक हजार रुपयांच्या खरेदीवर साडे 9 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल.