शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (18:07 IST)

RBI ची मोठी घोषणा!

RBI has increased the transaction limit for UPI Lite तुम्ही UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. RBI ने UPI Lite वापरकर्त्यांसाठी व्यवहार मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवली आहे. UPI Lite नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर केले होते. ही UPI ची सोपी आवृत्ती आहे.
 
UPI लाइट याच उद्देशाने सुरू करण्यात आला होता. जेणेकरून बँकेकडून प्रक्रिया अयशस्वी झाल्यास वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.  तुम्ही UPI वापरकर्ते असाल तर तुम्ही UPI Lite वापरू शकता. UPI द्वारे दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 1 लाख रुपये आहे. दुसरीकडे, UPI Lite वापरकर्ते कमाल 500 रुपयांपर्यंत प्रत्येक व्यवहार करू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 200 रुपये होती.
 
याशिवाय, आरबीआयकडून सांगण्यात आले आहे की, यूपीआय लाइटद्वारे नियर फील्ड तंत्रज्ञानाचा वापर करून यूपीआयमध्ये ऑफलाइन पेमेंट सुरू केले जाईल. MPC मध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना, RBI गव्हर्नर म्हणाले की वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. UPI LITE द्वारे ऑफलाइन पेमेंट करता येते. दास यांनी माहिती दिली की, या उपक्रमानंतर देशातील डिजिटल पेमेंटची पोहोच लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.