Reliance AGM मध्ये मोठ्या घोषणेची शक्यता
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी 23 जून 2021 रोजी होणार आहे. गुंतवणुकदारांना रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा आहे.
सभेत मुकेश अंबानी ऑईल टू केमिकल कारभार, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांसंदर्भात अनेक मोठे निर्णय जाहीर करु शकतात. मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. रिलायन्सच्या या बैठकीकडे उद्योग जगतासोबतच सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.
रिलायन्सच्या ऑईल-टू-केमिकल (O2C) आणि सौदी अरबची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको (Saudi Aramco) यांच्या दरम्यान 15 अब्ज रुपयांच्या व्यवहाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यामध्ये रिलायन्सच्या ऑईल टू केमिकलच्या 20 टक्के भागिदारी विक्रीसंबंधी बोलणी सुरु आहे. पण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यामध्ये फारशी काही प्रगती झाली नव्हती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या व्यवहाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
अंबानी यांच्याकडून जिओबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. देशभरॅट जिओचे 42 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. फाईव्ह-जी सेवेला परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आजच्या सभेत अंबानी जिओच्या फाईव्ह जी सेवेबाबत घोषणा करू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. त्याशिवाय झपाटयाने वाढणाऱ्या स्मार्टफोन्सच्या बाजारपेठ पाहता अंबानी याबाबत देखील मोठी घोषणा करू शकतात.
रिलायन्सकडून AGM च्या व्यासपीठावरून हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोशी व्यवहारासंदर्भातही या बैठकीत घोषणा होऊ शकते.