शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

हॉटेलच्या अन्नपदार्थाच्या बिलावर सवलत मिळवा

राज्यातील होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निडणूकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या अवाहनास प्रतिसाद देत हॉटेल मालक चालक असोशिएशनमधील हॉटेल मालक चालक असोशिएशन मध्ये नोंदणी असलेल्या सभासद असलेल्या हॉटेलामार्फत अन्नपदार्थाच्या एकुण बीलावर दिनांक 21/02/2017 रोजी मतदान करुन आलेल्या नागरिकांना 10 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
 
महानगपालिकेच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी जे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावुन हॉटेल मध्ये येणार आहेत त्यांना त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला म्हणून हॉटेल मधील अन्नपदार्थाच्या बीलावर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याकरीता नागरिकांनी मतदान केलेबाबतची बोटावरील न पुसण्या-या शाईची खुण दाखवावी लागणार आहे.त्यामुळे मतदान करा सवलत घ्या असा संदेश हॉटेल चालकांनी दिला आहे.