एसबीआयने व्याजदर घटवला
सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) एमसीएलआरमध्ये 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्के झाला आहे. यामुळे गृह, वाहन तसेच इतर प्रकारचे कर्जदर कमी होणार आहेत. कर्जदर कमी करण्याबरोबरच बँकेने ठेवीदरात कपात करून ठेवीदारांना झटका दिला आहे. आजच्या व्याजदर कपातीनंतर एसबीआयचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर आता 7.25 टक्के झाला आहे.