शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 एप्रिल 2020 (15:48 IST)

गृहकर्ज झाले स्वस्त; एचडीएफसीची व्याजदरात कपात

एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. नवे दर 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.
 
कोरोना संकटामुळे मंदीचा सामना करणार्‍या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्य कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत. मंगळवारी (दि.21) एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये 0.15 टकके कपात करण्याजे जाहीर केले. एचडीएफसीने, गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15 टक्के कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05 टक्के ते 8.85 टक्के दरम्यान असतील.
 
दरमन, मागील काही दिवसांपासून विविध कंपन्यांचे तिमाही नकारात्मक आले असताना एचडीएफसीने मात्र चांगली कमाई केल्याचे दिसून आले. गेल्या तिमाहीत एचडीएफसीचा नफा  
वाढला आहे. चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) बँकेचे व्याजातील उत्पन्न गेल्या वर्षीच्या  
तुलनेत 16.5 टक्क्यांनी वाढत 15,204.06 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. चौथ्या  
तिमाहीत या कालावधीत बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.72 टक्क्यांनी वधारुन 6,927.69 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.