शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (17:16 IST)

दक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी

south korea bans
जगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियाने या कंपनीकडून विकल्या गेलेल्या तब्बल 20 हजार कारवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. 
 
यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान बीएमडब्ल्यूच्या 27 कारला आग लागली होती. तपासाअंती इंजिनने पेट घेतल्याचे समोर आले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे.  या प्रकरणी बीएमडब्ल्यूच्या कोरियाई प्लांटकडून माफी मागण्यात आली असून जवळपास 1 लाखावर डिझेलच्या कार माघारी बोलविण्यात आल्या आहेत.
 
यामध्ये कंपनीच्या अलिशान 520डी या कारचाही समावेश आहे. कंपनीने जरी या कार माघारी बोलावल्या असल्या तरीही यापैकी 20 हजार कारची अद्याप तपासणी व्हायची आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या कार रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी दक्षिण कोरियाचे वाहतूक मंत्री किम ह्युन-मी यांनी बीएमडब्ल्यू कार मालकांना या कार मोठी दुर्घटना घडण्याआधीच कंपनीकडे परत कराव्यात, असे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.