सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

या बँकेत कर्मचार्‍यांना दुखवट्यासाठी 7 दिवसांची पगारी सुट्टी

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांना दुखवट्यासाठी 7 दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांना अशा प्रकारची सुट्टी देणारी सार्वजनीक क्षेत्रातील ही पहिलीच बँक आहे. यामुळे परिवारातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास या बँकेच्या कर्मचार्‍यांना आता 7 दिवसांची सुट्टी मिळणार असून ही सुट्टी पगारी असणार आहे. 
 
याशिवाय स्टेट बँक आपल्या कर्मचार्‍यांना आणखीही काही सुविधा देणार आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 हजारांपर्यंत मासिक पेंशन घेणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मेडिक्‍लेमच्या प्रिमियममध्ये बँकेतर्फे 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 20 ते 30 हजारापर्यंत पेंशन घेणार्‍यांना मेडिक्‍लेमच्या प्रिमियममध्ये 60 टक्के सुट देण्यात येणार आहे. याशिवाय बँक कर्मचार्‍यांच्या परिवाराचा मेडिक्‍लेम कवर 75 टक्क्यांहून 100 टक्के करण्यात येणार आहे.