काय हे, 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडू लागले
सांगलीतील विटा शहरात 500 रुपयांच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याची घटना घडली आहे. 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्यांचे तुकडे होत आहेत. वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुकेडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या 500 च्या नोटा तपासून पाहत आहेत.
विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले. राठोड यांनी जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांच्या बाबत (सात हजार रुपये) हा प्रकार घडल्याचे शाखा व्यवस्थापकांना सांगितले. रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे.