शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (21:46 IST)

ऑक्सिजनच्या तुटवडा दूर करण्यासाठी टाटा उद्योग समूहानं मदतीचा हात पुढं केला

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असताना आता टाटा उद्योग समूहानं मदतीचा हात पुढं केला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा समूहानं केली आहे. 
 
टाटाने घेतलेल्या या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. टाटा समूहाच्या या घोषणेनंतर काही मिनिटांतच पंतप्रधानांनी ट्विट केलं की हा टाटा समूहाचा दयाळूपणा आहे आणि आपण सगळे भारतीय नागरिक कोविड-19शी एकत्रितपणे लढा देऊ.
 
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरत असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देश या संकटाला सामोरा जात असताना टाटा समूहानं जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. टाटाने द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.
 
टाटा समूहानं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली की ‘द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून 24 क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करण्यात येत आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.