1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग, हिरवी मिरची 500 पर्यंत पोहोचली, कोणत्या भाज्यांचे भाव किती वाढले, दिलासा कधी?

tamatar
Tomato Price टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागांमध्ये 150 ते 180 रुपये किलोने विकले जात आहे. टोमॅटोबरोबरच कोथिंबीर, मिरची ते आल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान या किमती हंगामी असून 15 दिवसांत खाली येतील, असे सरकारने म्हटले आहे.
 
भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे व्यथित झालेल्या अनेकांनी टोमॅटो खाणे बंद केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत देशात टोमॅटोचे भाव कधी कमी होतील हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे. आणि यापूर्वी कोणत्या भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे तर भाव वाढण्याचे कारण काय आणि वाढलेल्या किमतीवर सरकार काय म्हणतंय हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा आहे कारण या किमती कधी कमी होतील याकडे सर्वांचे डोळे लागले आहे. 
 
टोमॅटो 100 ते 150 रुपये किलोने विकला जात असल्याने लोकांना ते खरेदी करण्यात अडचण येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही भाव लोकांच्या खिशाला आदळत आहेत. येथे टोमॅटोचे भाव विक्रमी 160 रुपये किलोवर पोहोचले आहेत. पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे, त्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत.
 
टोमॅटोचे भाव का वाढत आहेत?
मोठ्या उत्पादक केंद्रांमधून टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. पावसामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे हे हाल आहे. 
 
टोमॅटो व्यतिरिक्त कोणत्या भाज्यांचे भाव वाढले आहेत?
हिरवी मिरची 450 ते 500 रुपये किलोने विकली जात आहे. अनेक ठिकाणी हिरवी मिरची 300 ते 350 रुपये किलोपर्यंत विकली जात आहे, जी आठवड्यापूर्वी 150 रुपये किलो होती. तर गेल्या 15 दिवसांत भाजीपाल्याचे दरही झपाट्याने वाढले आहेत. कोथिंबीर 125 रुपये किलोने विकली जात आहे. तर फ्लॉवरचा भाव 60 रुपये किलोवर पोहोचला आहे. तसेच कोबीचे दर 60 रुपये किलो झाले आहेत. पूर आणि पावसामुळे इतर हिरव्या भाज्यांचे दरही चढे असल्याची माहिती देण्यात येत आहे. 
 
देशाला महागाई कमी होण्याची अपेक्षा असताना भाज्यांच्या दरात ही वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घरातील बजेटवर आणखी ताण आला आहे.
 
या किमती कधी कमी होतील?
टोमॅटोच्या दरात झालेली वाढ ही हंगामी घटना असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यावेळी किमती सामान्यतः जास्त असतात आणि पुढील 15 दिवसांत त्या खाली येतील. येत्या 15 दिवसांत दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची स्थिती सुधारल्यास टोमॅटोचा पुरवठा सुधारण्याची अपेक्षा आहे, तोपर्यंत भाव स्थिर राहतील. कारण मान्सूनच्या पावसाने पिकांना पुनरुज्जीवित करणे अपेक्षित आहे.
 
भाज्यांच्या वाढलेल्या दरांवर केंद्र सरकार काय म्हणतंय?
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याप्रमाणे टोमॅटो हा एकमेव आहे ज्याच्या किमती आठवड्यात वाढल्या आहेत. अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकसह इतर काही ठिकाणांहून टोमॅटोची आवक सुरू होताच भाव कमी होतील. गेल्या वर्षीच्या किमतींची तुलना केल्यास फारसा फरक नाही, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला. बटाटा आणि कांद्याचे भाव नियंत्रणात असल्याचे सां‍गितले.