शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 18 जून 2019 (13:10 IST)

GoAir आणि Vistara ने सुरू केली मान्सून सेल, फक्त 1,299 रुपयांमध्ये करा हवाई यात्रा

देशातील हवाई कंपन्यांचे मान्सून सेल सुरू झाले आहे. जर तुम्हीपण कुठे बाहेर जाण्याचा प्रोग्रॅम बनवत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम मोका असून तुम्ही या सेलमध्ये कमी किमतीत आपले तिकिट बुक करू शकता. या सेलमध्ये टाटा समूहाची विमानानं कंपनी विस्तारा एअरलाइंस आणि गोएअर सामील आहे. सांगायचे म्हणजे विस्ताराची सेल 17 जून रात्री 12 वाजेपासून 19 जून रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत राहणार आहे. 
 
3 जुलैपासून 26 सप्टेंबरच्या दरम्यान करू शकता प्रवास 
कंपनीने अशी माहिती दिली आहे की सेलच्या दरम्यान प्रवासी 3 जुलै ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान यात्रा करण्यासाठी तिकिट बुक करू शकतात. विस्ताराच्या प्रवक्त्याने ने सांगितले की कंपनीची 62 नवीन उड्डाणे 18 जून पासून परिचालनामध्ये येईल. तर लवकर करा तुमचे तिकिट बुक आणि घ्या हवाई यात्रेचा आनंद. 
 
या रूटवर सामील करण्यात येईल नवीन उड्डाणे
सांगायचे म्हणजे की विस्तारा लवकरच 62 नवीन उड्डाणे सामील करत आहे आणि हे उड्डाण दिल्ली ते मुंबई रूटवरून सुरू होईल. ह्या सर्व उड्डाणे दिल्ली आणि मुंबईला विभिन्न भागांमध्ये जोडेल. कंपनी द्वारे सुरू करण्यात येणार्‍या या 62 उड्डाण जुळल्यानंतर प्रवाशी मुंबई, अहमदाबाद, चंडीगड, वाराणसी आणि चेन्नईसाठी सरळ उड्डाण भरू शकतील. या वेळेस कंपनी अमृतसर, बेंगळुरू, दिल्ली, गोवा, हैदराबाद आणि कोलकातासाठी सरळ उड्डाणे परिचालित करत आहे.