शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (14:45 IST)

AIRBAG जीन्स लाँच, सेफ्टी फिचर आणि किंमत जाणून घ्या

रस्त्यावरील अपघातात कार Airbag खूप उपयुक्त असते पर आता बाइक चालवताना देखील सेफ्टी फिचर मिळाला तर कसं? स्वीडिश कंपनी Mo'Cycle ने अशी जीन्स बनवली आहे ज्यात एअरबॅग्ज बसवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अपघाताच्या वेळी या एअरबॅग्ज क्षणार्धात उघडून दुचाकीस्वाराला वाचवू शकतात. दुचाकीवर जाताना ही जीन्स घातली की अपघातात ओरखडेही येत नाहीत, असा दावा कंपनीचा आहे. स्वीडिश कंपनीनुसार एअरबॅग जीन्स 28 फेब्रुवारीला लॉन्च होईल.
 
या प्रकारे काम करेल जीन्स
जेव्हा दुचाकीस्वार घसरू लागतील तेव्हा जीन्समध्ये CO2 काडतुसे काडतुसे गॅस सोडण्यास सुरुवात करतील आणि एअरबॅग उघडतील. जीन्सची एअरबॅग फुगवण्यायोग्य सायकलिंग हेल्मेटनंतर उघडणार. हेल्मेट प्रथम स्वाराच्या डोक्याभोवती गुंडाळले जाईल जेणेकरून डोक्याला इजा होण्याची शक्यता टळेल. ही जीन्स बाइकच्या सीटला अर्थात लोडेड पिस्टनला जोडली जाणार. या पिस्टनपासून जीन्स वेगळे होताच जीन्समधील CO2 काडतूस गॅस सोडेल आणि रायडर जमिनीवर पडण्यापूर्वी एअरबॅग्ज सक्रिय होतील.
 
कंपनीनुसार या जीन्स इतर जीन्सप्रमाणेच म्हणजे अगदी नियमित डेनिमसारखे आहे. जीन्स पूर्णपणे सामान्य जीन्ससारखी दिसते. विशेष म्हणजे एअरबॅग उघडल्यानंतर त्याचा गॅस बाहेर काढून पुन्हा वापरता येतो.
 
कंपनीप्रमाणे जीन्सची एअरबॅग शरीराचा खालचा भाग कव्हर करेल. जीन्स स्पाइनल कॉलम आणि मांडीचे संरक्षण करेल. कंपनी द्वारा 70 किलोमीटर प्रतितास वेगाने याची चाचणी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
 
किंमत
या जीन्सची किंमत यूएस $ 499 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 41266 रुपये एवढी असेल.