मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (16:41 IST)

अनिल अंबानी यांच्याविरोधात येस बँकेची नोटीस

रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात खासगी क्षेत्रातील येस बँकेने मुंबईतील सांताक्रुज येथील मुख्यालय ताब्यात घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचे १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
 
येस बँकेकडून सांगण्यात आले आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला बँकेने २ हजार ८९२ कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. ही प्रक्रिया त्या कर्जाच्या रकमेच्या परतफेडीसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बँकेने रिलायन्सची नागिन महल येथील दोन कार्यालयेही ताब्यात घेतली आहेत. डिफॉल्टर्सचे असेट्स आपल्या ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना आहे. सध्या येस बँकेवर मोठ्या प्रमाणात बॅड लोन असल्यामुळे ते संकटात आहे. ते कमी करण्यासाठी येस बँक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावरही बँकांचे १२ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे.