गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑगस्ट 2022 (13:27 IST)

स्मार्टफोन खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार!

The government has decided to levy 15 percent custom duty on imports of mobile display assembly Marathi Business News
सणासुदीच्या काळात लोकांमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा कल देखील वाढतो. तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वाट न पाहता लवकर खरेदी करा. कारण येत्या काळाता काळात भारतात मोबाईल फोनच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. सरकारने मोबाईल डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर कस्टम ड्युटी वाढवली आहे. देशातील बहुतांश कंपन्या चीनमधून पार्ट्स आयात करून भारतात मोबाईल असेंबल करतात. अशा परिस्थितीत भारतात स्मार्टफोनची किंमत वाढणार आहे.
 
सरकारने मोबाईल डिस्प्ले असेंबलीचा भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याच्या निर्णय घेतला असून स्पीकर, सिम ट्रे सारख्या भागासह येणाऱ्या मोबाइलफोनच्या डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर केवळ 15 टक्के दराने बेसिक सीमा शुल्क लागू होण्याचे सांगितले आहे. 
 
येत्या काही काळात देशात 5G नेटवर्क सुविधा मिळणार आहे. स्मार्टफोन देखील नवीन अपडेशन सह येतात.मोबाईल डिस्प्ले असेम्बलीसाठी पार्टस आयात केले जातात. मोबाईल डिस्प्ले असेंबलीचे भाग असलेल्या आयातीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारचे नियम बदलण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्क्रीनचे प्रकार. सध्या, मोबाईल डिस्प्ले असेंबली युनिटच्या आयातीवर 10 टक्के दराने सीमा शुल्क आकारले जाते. पण कंपन्या फक्त सिंगल डिस्प्ले आयात करत नाहीत. तर त्याऐवजी डिस्प्ले असेंबली इंपोर्ट करतात. या असेंबली युनिटला स्क्रीनसोबतच स्पीकर आणि सिम ट्रे देखील जोडण्यात आला आहे.या आयात शुल्क मध्ये मोबाईल फोनच्या डिस्प्ले युनिट मध्ये टच पॅनल , कव्हर ग्लास, एलईडी बॅक लाईट, एफपीसी भागांचा समावेश आहे. हे आयात शुल्क सिम ट्रे आणि स्पीकर सारख्या वैयक्तिक उपकरणाचा आयातीवर नसणार