1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 डिसेंबर 2009 (17:03 IST)

एक जानेवारीपासून कार महागणार

एक जानेवारीपासून कार महागणार
WD
WD
उत्पादन दरात झालेली वाढ, डॉलरमध्ये सातत्याने सुरू असलेले चढ-उतार आणि कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने भारतीय बाजारातील कार उत्पादक कंपन्यांनी आता आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच कारच्या किंमती वाढणार आहेत.

फोर्ड इंडियाने यापूर्वीच आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सनेही किंमती वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

टोयोटा किर्लोस्कर, जनरल मोटर्स, स्कोडा, फिएट, या कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सहा ते 40 हजारांपर्यंत किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

स्टीलच्या किंमती आणि टायरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता कार उत्पादक कंपनीवर दबाव वाढत असल्याने किंमती वाढवण्या शिवाय पर्याय नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.