1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

जनरल मोटर्सचा FAW शी करार

अमेरिकेतील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्सने चिनी वाहन निर्माती कंपनी एफ् ए डब्ल्यूशी करार केला आहे. यात दोन अब्ज युआन किंवा 29.3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे.

जनरल मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पात उभय कंपन्यांची 50-50 टक्क्यांची भागिदारी असणार आहे. चीनमधील जनरल मोटर्सचे अध्यक्ष केवीन वेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे उभय कंपन्यांचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

या प्रकल्पासाठी चीनमधील छांगछून आणि हारबीन येथील प्रकल्पांचा वापर केला जाणार असून, या प्रकल्पांची उत्पादन क्षमता 90 हजार इतकी आहे.