Last Modified: मुंबई , बुधवार, 16 डिसेंबर 2009 (10:51 IST)
जेट एअरवेज 'नंबर वन'
WD
WD
मंदीच्या काळात अनेक संकटांचा सामना करत जेट एअरवेजने आपले पहिले स्थान या क्षेत्रात कायम ठेवले आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनी आणि तिच्या सहकारी कंपन्यांनी भारतीय एअरलाईन बाजारातील आपला दबदबा कायम राखला आहे.
नोव्हेंबर महिन्यात जेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 15 लाख 20 हजार होती. जेट लाइटच्या प्रवाशांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. या कालावधीत उभय कंपन्यांची भारतीय बाजारातील भागिदारी 7.5 टक्के होती.
या महिन्यात जेट लाइटने 2 लाख 91 हजार प्रवाशांनी प्रवास केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मंदीच्या काळातही कंपनीने चांगला व्यवसाय केला आहे.