आर्ची देणार आंतरजातीय विवाहाचा संदेश?
समाजामध्ये आंतरजातीय विवाहांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘सैराट’ मधील अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरुला सामाजिक न्याय विभाग ब्रँड अॅम्बेसेडर बनविणार आहेत. त्यादृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर अभियान चालविले जाणार आहे. असा विवाह करणार्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. आता रिंकू राजगुरु आणि तिच्या पालकांना ब्रँड अँम्बेसेडरबाबतचा प्रस्ताव दिला जाणार आहे. मात्रए रिंकू अल्पवयीन असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.