रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2016 (10:02 IST)

सैराटची आतापर्यंत 47 कोटींची कमाई

नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे. या सिनेमाने आतापर्यंत 47 कोटींची कमाई केली असून आर्ची आणि परश्याच्या जोडीने सगळ्यांना प्रेमात पाडलं आहे. 
 
सलग तिसर्‍या आठवडय़ात हा सिनेमा हाऊसफुल सुरु असून लवकरच हा सिनेमा 50 कोटींचा आकडा गाठेल तसेच मराठीतील अनेक रेकॉर्डस् तोडेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. 
 
यापूर्वी नटसम्राटने 40 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला होता. मात्र सैराटने 11 दिवसांत हा विक्रम नोंदवला. आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वाना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू-सुनेची मालिका याड लावत नाही तर तिला काटरून शो याड लावतात. 
 
तिला प्रश्न विचारण्यात आला, तुला कोणता चित्रपट आवडतो, किंवा तू यापूर्वी कोणते चित्रपट पाहिलेत. या प्रश्नावर रिंकू राजगुरू म्हणाली, खरं सांगू यापूर्वी मी जास्त चित्रपट पाहिले नाहीत. सर्वानी तिला प्रश्न विचारले तेव्हा आपलं उत्तर कसं सांगू असं रिंकूला झालं होतं. पण तिने हळूच नागराज मंजुळे यांना सांगितलं की कार्टून पाहायला आवडतं.