शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (16:07 IST)

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फोटोंवर गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.फरसाण घेऊन गेलीस का?

prajakta mali
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता.आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. सध्या आपण लंडनला असल्याचं प्राजक्ताने फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.

एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.

“हो शुभारंभ हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता.” अशी पोस्ट मध्यंतरी प्राजक्ताने केली होती.

आता लंडनमधील काही फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.चित्रीकरणाबरोबरच प्राजक्ता मिळालेल्या वेळेमध्ये लंडनमधील काही ठिकाणी जात आहे.

तिने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी देखील तिच्या फोटोंवर गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.फरसाण घेऊन गेलीस का? असा प्रश्न एका युजरेने कमेंटच्या माध्यमातून विचारला आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.प्राजक्ता लंडनमध्ये चित्रीकरण करत असलेला चित्रपट नक्की कोणता? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.