बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (12:39 IST)

संग्राम-खुशबूला पुत्ररत्न, काय ठेवलं मुलाचं नाव बघा...

आनंदाची बातमी म्हणजे २ नोव्हेंबर रोजी खुशबू आणि संग्रामच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. खुशबूने मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. 
 
संग्रामने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मुलाचं नाव देखील सांगितलं. '२-११-२१ राघव', असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. २ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या फोटोवर इंडस्ट्रीतील फ्रेंड्स शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sangram (@sangramsalvi)

सध्या संग्राम  'कन्यादान' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 'देवयानी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या संग्रामने 'आई माझी काळूबाई', 'गुलमोहर', 'सूर राहू दे' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. तर खुशबूने 'तेरे बिन', 'मेरे साई', 'आम्ही दोघी' अशा मालिकांमध्ये काम केलंय. खुशबू आणि संग्रामने ५ मार्च २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.