शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (16:14 IST)

कंगनाला ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखलेंचा पाठिंबा म्हणाले...

कंगनाने स्वातंत्र्याच्या दिलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी कंगना ने दिलेल्या वादग्रस्त विधानाला अभिनेते विक्रम गोखले यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की कंगना जे काही म्हणाली आहे ते खरंय ,आपल्याला स्वातंत्र्य भिकेनेच मिळाले आहे. मी याला समर्थन करतो. आपल्याला स्वातंत्र्य कोणाच्या मदतीने नव्हे तर भिकेनेच मिळाले आहे. त्यांनी आरोप केले आहे की, ज्यावेळी स्वातंत्र्यवीर फाशीवर लटकावले जात होते तेव्हा त्यांना कोणीच वाचवले नाही. ब्राह्मण महासंघाकडून या ज्येष्ठ अभिनेत्याचे त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य दिले. त्यांनी या वेळी पंतप्रधान मोदी यांची स्तुती देखील केली. ते म्हणाले की, जर भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर हे सगळ्यांसाठी चांगले ठरेल. भाजप शिवसेना युती होवो या साठी मी पुढाकार घेत आहे.  
त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने पुण्यातील दुधाणे लॉन्स मध्ये हा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की सध्या राजकीय वातावरणात गंभीर स्थिती झाली आहे. सध्या ब्राह्मण मराठा मतभेद केले जात आहे.आपण सर्व एकच आहो, मग हे मतभेद कशाला? कंगनाच्या वक्तव्याला समर्थन देत ते म्हणाले की, कंगनाने म्हटलेले विधान1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक मध्ये मिळाले आहे. खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले आहे. हे त्यांचे म्हणणे खरंय.आपल्याला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य भिकेनेच मिळाले आहे. जेव्हा आपले स्वातंत्र्यवीर फाशीवर लटकवले जात होते तेव्हा त्यांना कोणीच अडवले नाही. त्यांना कोणीच वाचवले नाही. असे आरोप ही ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले आहे. कंगना ला पाठिंबा दिल्यावरून कंगनाच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केल्याने वादात भर पडण्याची शक्यता आहे.