शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (23:18 IST)

पूजा सावंत दिसणार हिंदी गाण्यात

मराठी चेहरे जगभरात पोहोचवण्याचा 'सुमन एंटरटेनमेंट'चा प्रयत्न
 
'सुमन एंटरटेनमेंट'ने मराठी भाषेत अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली असून त्यांच्या प्रत्येक गाण्याला संगीतरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘सुमन एंटरटेनमेंट'ने निर्मित केलेले प्रत्येक गाणे श्रवणीय असून त्यातील दृश्येही विलोभनीय आणि नजर खिळवून ठेवणारी असतात. अशा दर्जेदार गाण्यांची निर्मिती करणारे 'सुमन एंटरटेनमेंट' आता हिंदीत पदार्पण करत आहे. मराठी प्रमाणेच हिंदीतही दर्जेदार गाण्यांची निर्मिती करण्याचा 'सुमन एंटरटेनमेंट'चे सर्वेसर्वा केदार जोशी यांचा मानस आहे. त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत दिसणार आहे. ‘सुमन एंटरटेनमेंट'ची या पुढील गाणी जरी हिंदी असली तरी या गाण्यांसाठी प्राधान्य मराठी कलाकारांना देऊन, हे चेहरे जगभरात पोहोचवण्याचा या निर्मिती संस्थेचा प्रयत्न असून लवकरच पंजाबी आणि गुजराती भाषांमध्ये देखील 'सुमन एंटरटेनमेंट'ची उत्तम गाणी प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.