रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (16:15 IST)

स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिवीरांचे स्मरण “स्वतंत्रते भगवते”

Independence Day
15ऑगस्ट म्हटला की देशासाठी त्याग, बलिदान करणार्‍या शूरवीरांचा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा, प्रज्ञावंतांना आठवण करणारा हा स्वातंत्र्य दिवस. गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्य भारताचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला होता. त्याची यशोगाथा मनात साठवून, आता पुन्हा 76 व्या वर्षात 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्व क्रांतिवीरांचे आपण स्मरण करणार आहोत. शूर वीरांना सांगीतीक आदरांजली वाहण्यासाठी चेतन नाकटे व वैशाली एम. जोशी यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आय डब्लू एस क्रिएशन आणि पंचमी कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 76 व्या स्वातंत्र्य दिनी, स्वातंत्र्य वीरांना आदरांजली देण्यासाठी “स्वतंत्रते भगवते” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. नृत्य, संगीत यांना प्राधान्य देणारा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी गायक म्हणून केतकी माटेगावकर, स्वप्निल बांदोडकर, उत्तरा केळकर, राहुल सक्सेना, माधुरी करमरकर, प्रशांत काळुंद्रेकर यांना निमंत्रित केले आहे. या निमित्ताने आजवर देशावर आधारित जी गाणी लोकप्रिय झाली आहेत, त्यांचा अंतर्भाव या कार्यक्रमात आहे. 15 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे हा स्वातंत्र्य वीरांचा हा जागर कार्यक्रम होणार आहे. 15 ऑगस्टच्या औचित्याने स्वातंत्र्यवीरांवर आधारित देशभक्ती पर गीतांचे गायन व नृत्य प्रकार तसेच सत्य घटनेवर आधारित स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय कमलिनी देशपांडे यांच्या जीवनावरील लघुनाट्य सादर होणार असून वैशाली जोशी व देवेश मिरचंदानी यांच्यासहित सहकलाकारांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमातून जमा होणार्‍या निधीतून, सामाजिक कार्यात अमूल्य कामगिरी करणार्‍या संस्थांना आर्थिक मदत देण्याचा मानस आहे. 
Edited by : Deepak Jadhav