GHAR BANDUK BIRYANI - नागराज मंजुळे, सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.