"झोलझाल" चे जय वीरू

jai viru
Last Modified सोमवार, 16 मार्च 2020 (16:55 IST)
शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती इंटरनॅशनलची निर्मिती असलेल्या झोलझालच्या निमित्ताने जय वीरूच्या भूमिकेतून आपल्याला भेटणार आहेत. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटामध्ये हास्य आणि विनोद याची छान पर्वणी पाहायला मिळणार हे टिझर पोस्टर पाहून लक्षात येत आहे. जय आणि वीरू च्या या छान जोडीचं मराठी पडद्यावरच "झोलझाल" रूप पाहायला धम्माल येणार हे नक्की. "झोलझाल" मधल्या जय वीरू चं पडद्यावरील नातं जितक सुंदर पाहायला मिळतंय तितकच पडद्यामागेही त्यांनी धम्माल केली असावी असं पोस्टरच्या झलक मधे दिसून येतंय. "झोलझाल"चे जय वीरू, अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके म्हणतात "ऑन स्क्रीन बंध तेव्हाच रंगत आणतात जेव्हा ऑफ स्क्रीन मैत्री तेवढीच जवळची आणि रंजक असते." येत्या १ मे ला तुम्हाला पडद्यावर ती पाहायला मिळेलच. शूट दरम्यान आमची ओळख झाली. या चित्रपटाने आम्हाला मैत्री दिली. जय आणि वीरू या गाजलेल्या जोडीला पुन्हा नव्या रूपात सादर करण्याची संधी "झोलझाल"मुळे आम्हाला मिळाली. शूट दरम्यान आम्ही खूप धम्माल केली. सेटवर सगळ्यांसोबत खूप खोड्या देखील केल्या कदाचित त्याचमुळे हा चित्रपट करताना सर्वच कलाकारांना मज्जा आली आणि आम्हाला जय वीरू साकारताना मदत झाली. मनोरंजनाचा गुलदस्ता आणि विनोदचा हास्यकल्लोळ घेऊन लवकरच आम्ही जय वीरूच्या रूपात तुमच्या भेटीला येऊ."
'झोलझाल' या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.
झोलझालच्या ऑफ स्क्रीन गमतीजमती ऑन स्क्रीन खूप सारी धम्माल घेऊन येणार आहेत. नक्की काय आहे हा झोल झाल पाहायला १ मे ला नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहाला भेट द्या.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

काय म्हणता, अक्षय सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलीब्रेटीच्या ...

काय म्हणता, अक्षय सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलीब्रेटीच्या यादीत
अभिनेता अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलीब्रेटीच्या यादीत सामील झाला आहे. ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये बघा घराचा कोपरा कोपरा
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. बिग ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे तिचे फोटो
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियाची फेवरिट आहे. सुहानाचे फोटो नेहमीच तिच्या ...

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?
सध्या देशात लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे टीव्ही अर्थात छोट्या पडद्यावर पुनरागम होताना ...

"दीपिका मोठ्या मोठ्या भूमिकादेखील सहज सुंदरतेने साकारते", ...

माधुरी दीक्षित भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अनेक ...