Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'

Updated: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (11:05 IST)
 
'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' हा सिनेमा 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे. सर्वसामान्य प्रेमीयुगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारे 'प्रीती सुमने' हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच, टी. सतीश चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदीची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसह त्यांनी हे गाणे गायलेदेखील आहे.  
येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला 'माझा अगडबम' हा सिनेमा मनोरंजनाची खुमासदार मेजवानी प्रेक्षकांना घेऊन येत आहे. सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

अद्वितीय शिवमंदिर ''बटेश्वर धाम उत्तर प्रदेश'', जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती सेठ आणि सेठाणी रूपात विराजमान

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

अमिताभ बच्चन यांनी अंधेरीतील ३ मजले दिले भाड्याने, महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

पुढील लेख
Show comments